Monday, December 30, 2013

विंडो शॉपिंग


दुकानाचा फक्त विंडो डिस्प्ले
पाहून पुढच्या दुकानाकडे वळणारा
मध्यमवर्गीय नामशेष झालाय…
नामशेष झालाय एकशिंगी गेंड्याप्रमाणे! 

शर्टाचे रंग अन् कापडाचा पोत 
किमती कुतूहलाचा नसता खटाटोप 
परत येतो, नंतर बघतो म्हणत
नजर चुकवून द्यायचा निरोप

आजचा मध्यमवर्गीय
थोडा आधुनिक झालाय 
काळाच्या झुळूकेबरोबर 
जरा पुढे सरकलाय

डिजीटल काळातल्या शॉपिंग वेबस्थळी
टाईप करा काही बाही 
रंग ढंगानुसर हजार राही
चोईस लंबीचौडी 

नसत्या मदतनिसाची गरज नाही
मागे मागे फिरणारी शेपूट नाही
'मदत करू का?' चा नाद नाही 
अन् मालकाची तिरकी नजर नाही 

मग क्लिकसरशी मांडणी करी
कमी किंमतीचे  दाखवा आधी
स्वस्त आवडत नाही 
अन् आवडलेले स्वस्तत नाही 

मग काय शक्कल लढवा भारी
आधीची विंडो बंद करी 
नजर चुकवता? गरजच नाही!
दुसरी वेब विंडो, क्लिक, खुली करी!

Tuesday, December 6, 2011

Sunday, June 5, 2011

आपलं माणूस

आपलं माणूस भेटणं यात एक वेगळाच आनंद असतो. त्यात हि तो मुंबई महानगरीच्या गर्दी मध्ये न शोधता सापडणं... नाही ओळखीचा नाही म्हणायचं मला... ओळखीचा अन आपलं माणूस यात खूप फरक आहे.

ओळखीचा माणूस हा फक्त आपला चेहरा ओळखतो. चेहऱ्याच्या मागच्या भावना, विचार त्याला अबोध असतात. आपल्या या बाजूचा त्याने कधी मागोवा घेतलेला नसतो किंवा प्रयत्नहि केलेला नसतो.

आपलं माणूस हे सगळं अगदी सहज करतो. तोच पुढे केलेला हात, तीच भेटण्याची जुनी पद्धत अन चेहर्यावरचं तेच ओळखीचं स्मित. नुसता स्मित नसता ते, तर ते आपल्या बद्दल च्या सुखद आठवणी, केलेल्या गमती-जमती, घडलेले किस्से या सर्वांमधून फुललेला असा ते हास्य असतं. त्याला नेमकी आठवत असते ती आपल्या बरोबर झालेली शेवटची भेट, अन तेव्हा शेअर केलेल्या गोष्टी, ज्याबद्दल तो विचारायचं विसरत नाही. आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवतो अन गरज असेल तर ओरडतो सुद्धा. त्याने काय केला तर आपल्याला बरं वाटेल हे हि त्याला ठाऊक असतं. पण हे सगळा कृत्रिम नसतं हं, अगदी सहज.

अनोळखी अन ओळखीचे सारे एका बाजूला अन आपलं माणूस एका बाजूला, एक वेगळाच समाधान देऊन जातं. जुन्या आठवणी जागवून जातं, दुखरे कोपरे दुमडून जातं अन हळव्या जखमांवर फुंकर मारून जातं. आपलं या जगात कोणी तरी आहे असा एक आधार देऊन जातं.

वैशाख ऋतूत वक हलकी श्रावणी सर देऊन जातं, रणरणत्या उन्हात थंड झुळूक देऊन जातं. आयुष्य एका नवीन उमेदीने लिहिण्यासाठी नवीन कागद देऊन जातं. अचानक का होईना पण भेट झाली म्हणजे परत भेट नक्की होईल असा आशावाद सुद्धा देऊन जातं.

आपलं माणूस सुखावून जातं.

Thursday, June 2, 2011

Cheese on your mind?

When I see or meet someone, my first attention goes to his/her face. Why? That is like reflection of your mind, your horizon.


I look at that face and try to find innocence. Not when one is looking at you or talking to you but those plenty of rare moments when that person is in his own world, lost. Don't mistake innocence with being gullible. Being innocent gives birth to creation, big heart, love, forgiveness and lot more...


When you see a person smiling most of the time, that person haves pursuit of happiness, because you can see real emotions of his world and has lots of happy moments and memories to cherish.


If you see a rich man sad, nothing will ever cheer him up and if you see poor smiling man, nothing will ever turn him down. You see that man and befriend him quick. A gem which will brighten your life forever.

Wednesday, April 27, 2011

Be selfish to be selfless

People often think, why should I think sensible, when world keeps being as it wants, irresponsible and taking insensible decisions.

But the main reason I should be sensitive and responsible is, because it's my life. It dosen't matter what Einstein and Newton had done in their lives. It matter, how does it matters to me. What change does it bring to my life and others.

Similarly it's forgotten how I jacked the world, many do, dosen't matter... But each individual remembers what I did different and how it Changed the lives of others positively. I'll be remembered for it.

It may seem selfish till now that I keep blabbering about me, me and me but only if it keeps lowering down from, my world, my country, my neighbours, my family, me.

But it should rise from, me, my life, my family, my friends, my neighbours, my country, it'll end up being my world.

Selfish to selfless.

Tuesday, April 26, 2011

गारा पाऊस

धड धड धड धड गर्जत येती,
विद्युल्लता प्रतीस्पर्धा करती
चम चम चम चम लक्ख चमकुनी,
डोळे विस्मये दिपवून टाकती

झप झप झप झप पाऊले टाकुनी,
काळ्या मेघांची दाटे गर्दी
काळे मेघ अन सफेत मोती,
काळी माती हरखून जय ती

सर सर सर सर थेंब बरसती,
ओले चिंब तन मन भिजवती
नाचती काही, काही लपती आडोशी,
सर्वा मधुनी रसिक ठरवती

टप टप टप टप मोती बरसती,
तृप्त मानस तहान लावी
भगवती ती तहान छोटी,
जागवती ती तृष्णा मोठी

खोटे मोती खोटी माळा,
वेडा प्रियकर वेडी माया
टप टप टप टप पडती गारा,
वेद प्रियकर गुंफी माळा

शुभ्र सडा पृथ्वीच्या अंगणी,
पर्जन्याची आली वर्दी
कुणास चिखल कुणास सर्दी,
आयुष्याचा अर्थ गुणगुणी

Monday, April 25, 2011

माय-लेकी

"दादा माझ्या बुटाचा सोल खूप गुळगुळीत झालाय रे. सटकायला होतं... कॉलेजमध्ये मी किती तरी वेळा पडता पडता वाचलेय माहितेय!" दादर मार्केट मध्ये माझ्या बरोबर फिरता फिरता मला गौरी तिचं गाऱ्हाणं सांगत होती. अन मी इकडे तिकडे दुकानं पाहत मध्येच आपलं 'हुं' करत चालत होतो. काय लागेल ते शॉपिंग करत होतो. दादर मार्केटमधून कधी एकदाची शॉपिंग उरकून घरी जातोय असा झाला होतं.

तसा माझ्या बहिणीचा स्वभावच होता, काही ना काही सतत सांगत असे. डोक्यात सतत विचार चालू असत. तिच्या विचारांपेक्षा तिच्या विचार करण्याची पद्धत मला विचित्र आणि मजेशीर वाटत असे. अन कधी कधी विचित्र आणि गंभीर.
दादर स्टेशनला पोहोचल्यावर पुलावरून चालत असताना माझं तिच्या काळजीपूर्वक चालण्याकडे लक्ष गेलं. तिच्याहि ते लक्षात आलं. ती लगेच म्हणाली, " अरे दादा, या पायऱ्यांच्या कडेला असलेल्या गुळगुळीत पट्ट्यांवरून सटकायला होतंय रे. म्हणून." सरळ विचार ऐकून मी 'हुं' केलं.

पण काहीतरी उगाचंच विचारावा म्हणून मी विचारलं, "का गं, पडण्याची भीती वाटते का?"
मी विचार केल्या प्रमाणेच वेगळं उत्तर मिळालं, "नाही."
"मग?", मी विचारलं. "लोक हसतील नं, म्हणून." ती म्हणाली.
"म्हणजे? पडून लागण्याची भीती नाही वाटत?" मी हसू दाबत गंभीरपणे विचारलं. "नाही रे. चालता चालता मी पडले आणि लोकांनी पहिला तर ते हसतील नं."
"होय गं ताई, पण ज्यांनी पहिला ते लोक तुला दिवसभर थोडीच दिसणार आहेत लाज वाटायला?" मी म्हणालो
"होय रे. पण ते लोक घरी गेल्यावर इतर लोकांना सांगतील नं. ऑफिसमध्ये, घरी, कि आज एक मुलगी कशी गमतीदार पणे पडली ते.", ती म्हणाली.
"ते ठीक आहे, नाव थोडी लक्षात ठेवणार आहेत तुझा ते? आणि समजा पडलीस तर काय करशील?"
"उठून लगेच पाळायला लागेन मी आणि गर्दीपासून पहिले दूर जाईन..."
"खूप दुखत असेल तर, आणि पाळता येत नसेल तर...?" मी म्हणालो. यावर तिने काही विषय वाढवला नाही.

घरी आल्यावर मी, गौरी आणि आई जेवायला बसलो असताना मी सहज विषय काढला. मी तीची गम्मत सांगणार तेवढ्या तिने आईला विचारलं, "ए आई, तू गर्दीमध्ये घसरून पडलीस तर काय करशील गं?"
"पटकन उठून पळून जाईन, गर्दीपासून दूर... मला नाही बाबा आवडणार कोणी माझ्यावर हसलेलं" आई म्हणाली. विजयश्रीच्या मुद्रेत तिने माझ्याकडे पाहिलं.

या मायलेकीना समजावून काही उपयोग नाही हेच खरं... मी आपलं हसून जेवणच पसंत केलं.